प्रश्नोत्तरे
स्वाइन इंफ्लूएंझा म्हणजेच स्वाइन फ्लू होय. हा एका विशिष्ट प्रकारच्या (एच१ एन१) विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे श्वसनक्रियेचा व प्रामुख्याने डुकरांमधे उद्भवणारा आजार आहे. हा सहसा डुकरांच्या नियमिततेत खंड पडल्याने होतो. माणसांना सहसा स्वाइन प्लू होत नाही. पण मानवी संसर्ग शक्य आहे आणि तो होतो.
स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा संसर्ग शक्यतो माणसातून माणसाला होत असतो. पूर्वी हे प्रमाण अत्यंत कमी होते व ते प्रमाण तिनहून अधिक माणसांमधे वाढत नसे.
स्वाइन फ्लूची लक्षणे
स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्वसाधारणपणे माणसांमधे उद्भवणा-या साधारण फ्लू प्रमाणेच असतात. काही नित्यनेमाची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत
- ताप येणे
- घसा खवखवणे
- अंगदुखी
- थकवा
- थंडी भरुन येणे
काही लोकांनी स्वाइन फ्लूमुळे अतिसार आणि उलट्या झाल्याचे कळवले आहे.
भूतकाळात स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे तीव्र आजार(न्युमोनिया आणि श्वसनाचे विकार) आणि मृत्यु ओढावल्याच्या नोंदी आहेत.
हंगामी फ्लूप्रमाणेच स्वाइन फ्लू हा अंतर्गत चिकित्साविषयक परिस्थिती बिघडल्यामुळे होत असतो
स्वाइन फ्लूची लक्षणे हंगामी फ्लू प्रमाणेच असू शकतात. ती लक्षणे खालीलप्रमाणे
- १०० अंश किंवा ३७.८ से. पेक्षा जास्त ताप
- घसा खवखवणे
- कफ
- नाक वाहणे
- थंडी भरुन येणे
- डोकेदुखी किंवा किंवा अंगदुखी
- थकवा
ज्याप्रमाणे हंगामी फ्लूचा प्रसार होतो त्याचप्रमाणे एच१ एन१ विषाणूंचा म्हणजेच स्वाइन फ्लूचा प्रसार होत असतो. फ्लूचे विषाणूंचा संसर्ग हा माणसातून माणसाला कफद्वारे अथवा शिंकेमुळे होत असतो. काही वेळा हे विषाणू इतरत्र पडलेल्या वस्तुंवर असतात. अशा वस्तुंना हाताळल्यानंतर तोंडाला किंवा नाकाला हात लावल्यानेही फ्लूचा संसर्ग होऊ शकतो.
- अशाप्रकारचा संसर्ग असलेल्या जनावरांना नष्ट केल्याने.
- वर्गीकरण करणे: संसर्ग झालेल्या किंवा होऊ शकणा-या क्षेत्रास वर्ज करणे.
- विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा पर्याय विवादास्पद असा आहे. इंडोनेशिया देशाने सर्वप्रथम जुलै २००४ मधे पोल्ट्री लसीकरण अस्तित्वात आणली. त्यानंतर थायलंड देशानेही या पद्धतीचा अवलंब केला होता.
- प्रगत साधारण फ्लूसाठी लसीकरण - जे लोक संसर्ग असलेल्या जनावरांना नष्ट करण्याचे काम करतात अशांसाठी दोन्ही प्रकारच्या फ्लूपासून म्हणजेच बर्ड फ्लू व माणसाच्या फ्लूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण केले जाते.
संसर्ग झालेली व्यक्ती संसर्ग झालेल्या पहिल्या दिवसापासून संसर्ग वाढवू शकते. ७ व्या दिवशी पूर्णतः आजारात जखडला गेल्यानंतरही त्या व्यक्तीपासून संसर्ग होतच असतो. याचाच अर्थ आपणास बाधा झालेली असल्याचे किंवा आपण आजारी असल्याचे माहित पडण्याआधीच आपल्यापासून संसर्ग होऊ शकतो.
प्रथम आणि सर्वात महत्वाचे: आपले हात स्वच्छ पाण्याने नियमित धुवावे, आपली प्रकृती उत्तम राहील अशाच ठिकाणी रहावे, पुरेशी झोप घ्यावी. शाररिक रित्या क्रियाशील रहावे, आपल्या ताणतणावाचे नियोजन करावे, सकस आहार घ्यावा. स्पर्ष केल्याने फ्लू होईल अशा कोणत्याही वस्तुस अथवा त्याचे पृष्ठभाग हाताळू नये. आजरी असलेल्या व्यक्तींचा संपर्क टाळावा.
सुरक्षिततेसाठी दक्षता
- संसर्ग असलेल्या देशातील किंवा विभागातील पोल्ट्री अथवा बाजार परिसरात फिरू नये.
- स्वतःच्या स्वच्छतेची सुरक्षिततेची काळजी स्वतःच घ्या. विषेशतः खाद्य पदार्थ निवडताना, बनवताना, स्वच्छता गृह वापरताना आपले हात स्वच्छ धुवून घ्या.
- मटण चांगले शिजवून खावे.
- अर्धवट शिजलेले मटण खाणे टाळावे.
- संसर्ग असलेल्या परिसरात आजारी पडल्यास किंवा फ्लू सारखी लक्षणे(ताप,अंगदुखी, कफ, नाक वाहणे) जाणवल्यास ताबडतोब वैद्यकीय तपासणी करुन घ्या.
स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस शोधली गेलेली नाही. या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी रोज खबरदारी घेणे हा एकमेव बचावात्मक पर्याय आपल्यासमोर आहे. खालील दक्षतांची रोज काळजी घ्या.
- आपले नाक व तोंड रुमालाने झाकावे. शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. वापर झाल्यावर टिशू फेकून द्यावा.
- आपले हात साबण व स्वच्छ पाण्याने (विशेषतः शिंक किंवा कफ काढल्यानंतर) नियमित धूवावेत.
- आपल्या डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.
- आजारी व्यक्तींशी जवळिक टाळावी.
स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार खाद्य पदार्थांमार्फत होत नाही. डुकराचे मटन किंवा मटणाचे प्रकार खाल्ल्याने स्वाइन फ्लू होत नाही. व्यवस्थित हाताळलेले व चांगले शिजवलेले मटन सुरक्षितच असते.
- निरोगी राहण्यासाठी लोकांनी खालील खबरदारी घ्यावी.
- आपले नाक व तोंड रुमालाने झाकावे. शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. वापर झाल्यावर टिशू फेकून द्यावा.
- आपले हात साबण व स्वच्छ पाण्याने (विशेषतः शिंक किंवा कफ काढल्यानंतर) नियमित धूवावेत.
- आपल्या डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.
- आजारी व्यक्तींशी जवळिक टाळावी.
जर आपण आजारी असाल तर कमीत कमी लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या घरातच किंवा आपण थांबलो असलेल्या हॉटेलच्या खोलीतच थांबावे. कफ किंवा शिंके पासून प्रसार रोखण्यासाठी आपले नाक व तोंड झाकूनच ठेवावे. कफ किंवा शिंकेसाठी वापरलेल्या वस्तु फेकून द्याव्यात. प्रत्येक वेळी हात स्वच्छ धूवून घ्यावेत.
- अन्न किंवा खाद्य पदार्थासंदर्भात घ्यावयाची दक्षता.
- अन्न व खाद्य पदार्थ चांगले शिजवलेले असावे.
- स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचे पालन करावे.
- चांगल्या सुरक्षित जागेतूनच खाद्यपदार्थ विकत घ्यावे.
- सिलबंद पदार्थांवरील नष्ट करण्याची तारीख वाचूनच पदार्थ विकत घ्यावेत.
- जेवणासाठी बाहेर जाताना स्वच्छ व सुरक्षित अशी खानावळ किंवा हॉटेल निवडावे.
सर्वसाधारण आरोग्यविषयक सल्ला
- जवळीक टाळावी. आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी. सुरक्षित अंतर ठेवावे.
- आपण आजारी असाल तर घरीच रहावे. जर शक्य असेल तर आपल्या शाळा,व्यवसाय यांपासून दुर रहावे.
- आपले नाक व तोंड झाकावे. कफ किंवा शिंका येत असतील तर आपले तोंड व नाक झाकून घ्यावे.
- हात स्वच्छ ठेवणे नियमितपणे आपले हात स्वच्छ धुवावेत.
- नाक, डोळे, तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे. जेव्हा आपण स्पर्श करतो तेव्हा त्या वस्तुवर असलेले विषाणू आपल्या हाताला चिकटतात व अशावेळेस तोच हात तोंड, डोळे किंवा नाकाला लावल्यास संसर्ग होऊ शकतो.
लहान मुलांना खालील त्रास झाल्यास ताबडतोब वैद्यकीय निरिक्षतेसाठी हलवावे
- श्वसनाची क्रिया जलद होणे किंवा श्वसनास त्रास होणे.
- त्वचेचा रंग निळसर झाल्यास.
- द्रव पदार्थ पुरेश्या प्रमाणात न घेत असल्यास.
- लवकर जाग येत नसेल किंवा प्रतिउत्तर देत नसल्यास.
- फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास किंवा लक्षणे गेल्यावर पुन्हा ताप येत असल्यास.
- लाल चट्ट्यांसह ताप.
खालील लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे
- श्वसनात अडथळा किंवा श्वसनाचे त्रास
- छातीत किंवा पोटात दुखणे
- अचानक चक्कर येणे
- गोंधळून जाणे
- वारंवार उलट्या होणे
स्वाइन फ्लूसाठी अद्याप कोणतीही लस शोधली गेलेली नाही. उपलब्ध अशा कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाने स्वाइन फ्लूपासून रक्षण होऊ शकत नाही. स्वाइन फ्लू च्या विषाणूंचे स्वरुप बदललेले आहे त्यामुळे आजच्या स्वरुपाला अनुसरुन लसीचे संशोधन व्हायचे बाकी आहे. या बदलत्या स्वरुपामुळे योग्य अशा विषाणूंवर संशोधन करणे गरजेचे आहे.
प्रतिबंधक औषधे फ्लूवर उपचार म्हणून किंवा त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून दिल्या जातात. औषधांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- ऍडामांटनेस (अमांटॅडाईन व रेमांटॅडाईन)
- ओसेल्टामिवीर व झॅनम्वीर
